Skip to main content

 

Science 37 वेब आधारित आणि माेबाइल ॲप्लिकेशन प्लॅटफाॅर्मच्या अटी आणि नियम

तुमचा Science 37 च्या वेब-आधारित किंवा मोबाईल अनुप्रयोग प्लॅटफॉर्मचा वापर हा या अटी आणि शर्ती तुम्ही स्वीकृत करत असल्याचे दर्शवतो. वैद्यकीय चाचणीमध्ये तुमच्या सहभागास सुविधा देण्यासाठी तुम्हाला Science 37 च्या वेब-आधारित आणि/मोबाइल ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मला प्रवेश पुरवण्यात आला आहे. कृपया तुम्ही अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचण्याची खात्री करावी, विशेषत: हमी, परवाना मर्यादा, तुमचे प्रतिनिधीत्व आणि हमी, दायित्वाची मर्यादा, नुकसान भरपाई आणि नियमन कायदा असे विभाग, जे आम्ही कॅपिटल केले आहेत, त्यांना अधोरेखित केले किंवा बोल्ड केले आहे. या अटी आणि शर्तींना नकार दिल्यास चाचणीमध्ये सहभागी होण्याच्या तुमच्या पात्रतेवर परिणाम करू शकतात.

आम्ही काेण आहाेत आणि या कराराबददल

Science 37, इंक. (एकत्रितपणे ज्याला "Science 37", “आम्ही” किंवा "आपण" म्हणून संदर्भ देतो) तुम्हाला Science 37 च्या वेब-आधारित आणि/किंवा मोबाइल ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म ("प्लॅटफॉर्म") ला परवानगी देऊन वैद्यकीय चाचणीमध्ये तुमचा सहभाग सुलभ बनवते. हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तुम्ही स्वारस्य व्यक्त केलेल्या वैद्यकीय चाचणी ("चाचणी") चा भाग म्हणून Science 37 च्या प्लॅटफॉर्मचा वापर करू देते. या अटी आणि शर्ती ("अटी आणि शर्ती") Science 37 आणि तुम्ही, व्यक्ती ("तुम्ही" आणि "तुमचे") यांच्यात प्लॅटफॉर्म आणि सेवेचा तुमच्या प्रवेश आणि वापराबाबत कायदेशीर करार तयार करतात. या Science 37 आणि तुम्ही, या प्लॅटफॉर्ममधील तरतुदी या अटी आणि शर्तींना "सेवा" असे संदर्भित करतात.  

 

Science 37 ची भूमिका ही, प्लॅटफॉर्म आणि सेवा तुमच्यासाठी उपलब्ध करून देणे इतकीच मर्यादित आहे. Science 37 हा वैद्यकीय चाचणीचा प्रायोजक आहे आणि आरोग्यनिगा प्रदाते आणि सेवेद्वारे तुम्हाला चाचणीशी संबंधित सेवा पुरवणारे इतर कर्मचारी यांच्यापासून स्वतंत्र आहे. Science 37 ही त्यांच्यासाठी जबाबदार नाही आणि तिची अशा आरोग्यनिगा प्रदात्यांच्या कर्मचार्‍यांची कृती, चुक किंवा त्यांच्याद्वारे संप्रेषित केलेल्या कोणत्याही सामग्रीसाठी दायित्व नाही. हा प्लॅटफॉर्म आणि सेवा पुरवून Science 37 वैद्यकीय आणि आरोग्य सल्ला किंवा सेवा पुरवत नाही.

तुमची गाेपनीयता

तुमच्या प्लॅटफाॅर्म आणि सेवेच्या वापराद्वारे तुम्ही प्रदान केलेली काेणतीही वैयक्तिक माहीती आम्ही आमच्या गाेपनीयता धाेरणात दिलेल्या पध्दतीने वापरताे. आम्ही हा डेटा इतर काेणत्याही प्रकारे वापरत नाही.

तुम्ही ॲप स्टाेरवरून प्लॅटफाॅर्म डाउनलाेड केल्यास, अशा ॲप स्टाेअरच्या अटी आणि शर्ती आणि गाेपनीयता धाेरण तुम्हाला लागू असू शकते. आम्ही तुम्हाला तुम्ही डाऊनलोड करण्यासाठी वापरलेल्या संबंधित ॲप स्टोअरच्या अटी आणि ते तुमची वैयक्तिक माहिती कशी वापरतात हे समनून घेण्यासाठी त्यांच्या अटी आणि शर्ती आणि गोपनीयता धोरण वाचण्यास प्रोत्साहन देतो.

 

प्लॅटफाॅर्मसाठी समर्थन

जर तुम्हाला प्लॅटफॉर्मविषयी अधिक जाणण्याची इच्छा असेल किंवा प्लॅटफॉर्म वापरण्यामध्ये सहाय्य हवे असेल्यास, कृपया techsupport@science37.com वर आमच्याशी संपर्क साधा.

या अटी आणि शर्ती स्वीकारण्यासाठी आणि प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी तुमचे वय 13 (किंवा तुमच्या देशामध्ये किंवा रहिवासाच्या प्रदेशात समतुल्य किमान वय) किंवा त्याहून अधिक असायला हवे.

जर तुमच्याकडे या अटी आणि शर्तींमधेय प्रवेश करण्याची कायदेशीर क्षमता नसेल (उदाहरणार्थ तुम्ही अल्पवयीन असाल), कृपया तुम्ही या अटी आणि शर्ती तुमच्या कायदेशीर पालकांसोबत वाचण्याची खात्री करावी आणि त्यांनी तुमच्या वापराला आणि या अटी आणि शर्तींना संमती दिल्यानंतरच प्लॅटफॉर्मचा वापर करावा.

तुम्ही प्लॅटफाॅर्म कसा वापरू शकता

या अटी व शर्तींचे पालन करण्यास सहमती देण्याच्या बदल्यात तुम्ही करू शकता:

(i)        तुमच्या मोबाइलवर डिव्हाइसवर प्लॅटफॉर्मची प्रत डाऊनलोड करा आणि केवळ तुमच्या वैयक्तिक हेतूसाठीच अशा डिव्हाइसवर प्लॅटफॉर्म आणि सेवा पहा, वापरा आणि दाखवा; आणि

(ii)        कोणताही पूरक सॉफ्टवेअर कोड किंवा आम्ही तुम्हाला उपलब्ध करू असे "पॅचेस" आणि चुकांच्या दुरूस्ती एकत्र करणारी प्लॅटफॉर्मची अद्यतने मिळवा आणि त्यांचा वापर करा.

तुम्ही प्लॅटफाॅर्म इतरांना हस्तांतरित करू शकत नाही.

या अटी आणि शर्तींसह तुमच्या स्वीकृतीच्या बदल्यात, आम्ही तुम्हाला वर नमूद केल्याप्रमाणे वैयक्तिकपणे प्लॅटफॉर्म आणि सेवांचा वापर करण्याचा अधिकार देत आहोत.तुम्ही अन्यथा प्लॅटफाॅर्म किंवा सेवा इतरांना हस्तांतरित करू शकत नाहीत.

प्लॅटफाॅर्ममध्ये अद्यतने आणि सेवेमधील बदल

प्रदर्शन सुधारण्यासाठी, कार्यक्षमता वर्धित करण्यासाठी, ऑपरेटींग सिस्टीममध्ये बदल दर्शवण्यासाठी किंवा सुरक्षा समस्या संबोधण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवा स्वयंचलितपणे अद्ययावत करू शकतो किंवा त्यांच्यामध्ये बदल करू शकतो.पर्यायीपणे, आम्ही तुम्हाला या कारणांसाठी प्लॅटफॉर्म अद्ययावत करण्याचे विचारू शकतो.

तुम्ही अशी अद्यतने इन्स्टॉल न करण्याचे निवडले किंवा तुम्ही स्वयंचलित अद्यतनाची निवड रद्द केल्यास तुम्ही यापुढे प्लॅटफॉर्म आणि सेवा वापरणे सुरू ठेवू शकणार नाही.

तुम्ही वापरत असलेला फाेन किंवा डिव्हाइस इतर कोणाच्या तरी मालकीचा असेल

जर तुम्ही तुमच्या मालकीच्या नसलेल्या कोणत्याही फोन किंवा इतर डिव्हाइसवर प्लॅटफॉर्म डाऊनलोड केला, तर तुमच्याकडे तसे करण्यासाठी मालकाची परवानगी असायला हवी.तुम्ही ज्या फोनवर किंवा इतर डिव्हाइसवर प्लॅटफॉर्म डाऊनलोड केला आहे तो तुमच्या मालकीचा असो  किंवा नसो, तुम्ही या अटी आणि शर्तींचे पालन करण्यास जबाबदार असाल.

परवाना निर्बंध

आपण सहमत आहात की आपण या गोष्टी करणार नाही:

(i)        या परवान्याद्वारे स्पष्टपणे परवानगी दिल्याशिवाय, प्लॅटफाॅर्मला काॅपी करा;

(ii)        पेटंटयोग्य असो किंवा नसो, प्लॅटफॉर्मची व्युत्पन्न कार्ये किंवा सुधारणांमध्ये बदल करणे, ते भाषांतरीत करणे, स्वीकारणे किंवा अन्यथा तयार करणे;

(iii)       प्लॅटफॉर्मच्या सोर्स कोड किंवा त्याच्या कोणत्याही भागाला रिव्हर्स इंजिनिअर करणे, वेगळे करणे, डिकंपाइल करणे, डिकोड करणे किंवा अन्यथा तो मिळवण्याचा किंवा प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करणे;

(iv)      प्लॅटफॉर्ममधून कोणतीही व्यापारी चिन्हे किंवा कोणतेही कॉपीराइट, व्यापारी चिन्ह, पेटंट, किंवा इतर बौध्दीक संपदा किंवा मालकी अधिकाराच्या सूचना व त्यांच्या प्रती काढून टाकणे, हटवणे, दुरूस्त करणे किंवा ते लपवणे;

(v)       कोणत्याही वेळी एकाधिक डिव्हाइसद्वारे प्रवेश मिळवण्यास सक्षम होईल अशा नेटवर्कवर प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यासह कोणत्याही कारणाने कोणत्याही तृतीय पक्षाला प्लॅटफॉर्म किंवा प्लॅटफॉर्मची कोणतीही वैशिष्ट्ये किंवा कार्यक्षमता भाड्याने देणे, भाडेपट्ट्यावर देणे, उसणे देणे, विक्री करणे, उपपरवाना देणे, नियुक्त करणे, वितरीत करणे, प्रकाशित करणे, हस्तांतरित करणे किंवा उपलब्ध करणे,

(vi)      प्लॅटफॉर्ममधील किंवा त्याच्या संरक्षणासाठी असलेले कोणतेही नक्कल संरक्षण, अधिकार व्यवस्थापन किंवा सुरक्षा वैशिष्ट्ये काढून टाकणे, अक्षम करणे, बगल देणे किंवा अन्यथा कोणतेही वर्क उपाय तयार करणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे.

तुमचे प्रतिनिधीत्व आणि हमी

तुम्ही प्लॅटफॉर्मचा वापर करून खालील गोष्टींना सहमती देता:

(i)        तुम्ही प्लॅटफाॅर्म किंवा सेवा काेणत्याही बेकायदेशीर रितीने, काेणत्याही बेकायदेशीर हेतूने किंवा या अटींशी विसंगत काेणत्याही प्रकारे वापरनार नाही किंवा प्लॅटफाॅर्म किंवा सेवेमध्ये हॅक करून किंवा व्हाइरस किंवा इतर हानीकारक डेटा यासारखे दुर्भावनापूर्ण काेड टाकून कपटाने किंवा दुर्भावनापूर्ण कृती करणार नाही;

(ii)       तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्म किंवा सेवेच्या वापरासंदर्भात आमच्या बाैद्धिक संपदा अधिकारांचे किंवा काेणत्याही तृतीय पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करणार नाही;

(iii)      तुम्ही प्लॅटफाॅर्म किंवा सेवेच्या तुमच्या वापरासंदर्भात कोणतेही बदनामीकारक, अपमानकारक किंवा अन्यथा आक्षेपार्ह अशी काेणतीही सामग्री प्रसारित करणार नाही

(iv)      तुम्ही प्लॅटफाॅर्म किंवा सेवांच्या सुरक्षिततेला हानी पोहचवेल, अक्षम करेल, अतिभार टाकेल, दुर्बल करेल किंवा तडजोड करेल किंवा इतर वापरकर्त्यांसह हस्तक्षेप करेल अशा कोणत्याही प्रकारे प्लॅटफॉर्म किंवा सेवांचा वापर करणार नाही; आणि

(v)       तुम्ही सेवेकडुन कोणतीही माहीती किंवा डेटा गाेळा करणार नाही किंवा काढणार नाही.

बाैद्धिक मालमत्ता अधिकार

जगभरामधील प्लॅटफॉर्म आणि सेवांमधील सर्व बाैद्धिक संपदा अधिकार हे Science 37 शी संबंधित आहेत आणि प्लॅटफॉर्म आणि सेवांमधील अधिकारांचा तुम्हाला परवाना (विक्री नाही) दिला गेला आहे. प्लॅटफॉर्म आणि सेवांचा या अटी आणि शर्तींनुसार वापर करण्याच्या अधिकाराव्यतिरिक्त तुमच्याकडे प्लॅटफॉर्म किंवा सेवांमध्ये किंवा ला कोणताही बाैद्धिक संपदा अधिकार नाही.

समाप्ती

जर तुम्ही या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केले, तर प्लॅटफाॅर्म आणि/किंवा सेवा वापरण्याची तुमची क्षमता संपुष्टात आणली जाईल. या कृती Science 37 कडे कायद्यात उपलब्ध असलेल्या इतर कोणताही अधिकार किंवा उपायामध्ये भर आहेत.

तुम्ही प्लॅटफाॅर्मवर प्रवेश करणे आणि तो वापरणे बंद करून या अटी शर्ती संपुषटात आणू शकता.  

आम्ही काेणत्याही कारणाशिवाय किंवा कोणत्याही कारणासाठी काेणत्याही वेळी सूचना न देता, या अटी व शर्ती रद्द करू शकताे.

समाप्त झाल्यावर:

या अटी आणि शर्तींनुसार तुम्हाला दिलेले सर्व अधिकार देखिल संपुष्टात येतील; आणि तुम्ही प्लॅटफाॅर्मचा वापर थांबवायला हवा आणि तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरून ॲप हटवायला हवा. Science 37 प्लॅटफाॅर्मवरील तुमचे प्रवेश अधिकार काढुन टाकेल.

संपुष्टात आणण्यामुळे कायद्यामध्ये किंवा इक्विटीमधे Science 37 चे कोणतेही अधिकार किंवा निष्पक्षतेवर मर्यादा घातली जाणार नाही.

हमींचे अस्वीकरण. प्लॅटफॉर्म हा तुम्हाला "जसा आहे तसा" आणि कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय सर्व दोष आणि चुकांसह पुरवला गेला आहे. लागू होणार्‍या कायद्यांतर्गत परवानगी असलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, SCIENCE 37  ही व्यापारितेच्या व्यक्त वॉरंटीज, विशिष्ट हेतूसाठी योग्यता, शीर्षक आणि गैर- उल्लंघनाच्या सर्व वॉरंटीज, आणि व्यवहाराचा कालावधी, प्रदर्शन, वापर किंवा व्यापारी पध्दतीचा कालावधीमधून निर्माण होणार्‍या हमींसह प्लॅटफॉर्मच्या संदर्भात स्पष्टपणे व्यक्त असो, अव्यक्त असो, नियामक असो किंवा अन्यथा असो, सर्व हमींचे अस्वीकरण करते. मागील गोष्टींच्या मर्यादेशिवाय, SCIENCE 37 हे कोणतीही वॉरंटी किंवा हमी पुरवत नाही, आणि प्लॅटफॉर्म तुमचया आवश्यकता पूर्ण करेल, कोणतेही उद्देशित परिणाम मिळवून देईल, अनुरूप राहिल किंवा इतर कोणत्याही सॉफ्टवेअर, अनुप्रयोग, यंत्रणा किंवा सेवांसोबत काम करेल, कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करेल, कोणतेही प्रदर्शन किंवा विश्वसनीयता मानके पूर्ण करेल किंवा त्रुटी मुक्त राहिले किंवा कोणत्याही त्रुटी किंवा दोषांमध्ये सुधारणा केली जाऊ शकेल किंवा केली जाईल यांसारखे कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधीत्व करत नाही.

मागील असले तरीही, या अटी आणि शर्तींमधील काहीही इतरांसाठी दुर्लक्ष, फसवणूक किंवा फसवणूकीचे प्रतिनिधीत्वामुळे झालेला मृत्यू किंवा वैयक्तिक दुखापतीसाठी किंवा लागू होणार्‍या कायद्यानुसार मर्यादित केले किवा वगळले जाऊ शकत नाही अशा इतर दायित्वासाठी कोणत्याही पक्षाचे दायित्व वगळण्याचा किंवा त्यावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करत नाही.

काही अधिकारक्षेत्रे काही अस्वीकरण किंवा हमींना परवानगी देत नाहीत त्यामुळे वरीलपैकी काही किंवा सर्व तुम्हाला लागु हाेणार नाहीत.

प्लॅटफॉर्मची सुरक्षा. तुम्ही समजता आणि सहमती देता की प्लॅटफॉर्म हा, बहुतांश इतर इंटरनेट सॉफ्टवेअर आणि सेवांप्रमाणे सुरक्षा समस्यांना (यांसह पण तितकेच मर्यादित न राहता वापरकर्ता, नेटवर्क सेवेचा दर्जा, सामाजिक पर्यावरण, व्हायरसेस, ट्रोजन हॉर्स प्रोग्राम्स, दुर्भावपूर्ण प्रोग्राम्स इ.) ना अधीन असू शकतो. Science 37 हे तुमच्याद्वारे किंवा असुरक्षित इंटरनेट कनेक्शनचा वापर करून तुमच्या मोबाइल डिव्हाइसद्वारे केलेल्या कोणत्याही माहितीच्या प्रेषणाच्या  सुरक्षिततेसाठी जबाबदार असणार नाही आणि ते त्याची खात्री देत नाहीत. तुम्ही प्लॅटफॉर्म वापराच्या अंतर्निहित सुरक्षा परिणामांना स्वीकारता आणि आम्ही तुम्हाला तुमच्या डिव्हाइसचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा उपायांचा (जसे अद्ययावत ॲन्टीव्हायरस सिस्टीमद्वारे) स्वीकार करण्याचा सल्ला देतो.

दायित्वाची मर्यादा. यासाठी लागू होणार्‍या कायद्याद्वारे परवानगी असलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, कोणत्याही घटनेमध्ये SCIENCE 37 चे तुमच्या प्लॅटफॉर्म किंवा सामग्री आणि सेवांच्या वापराशी किंवा वापरण्यास आलेल्या अक्षमतेमुळे उद्भवलेल्या किंवा त्याच्याशी संबंधात कोणतेही दायित्व नसेल :

वैयक्तिक दुखापत, मालमत्तेला झालेली हानी, गमावलेला नफा, बदली माल किंवा सेवांचा खर्च, डेटा हानी, पत हानी, व्यवसायिक व्यत्यय, संगणक अपयश किंवा खराबी, किंवा कोणताही इतर परिणामी, घटनात्मक, अप्रत्यक्ष, अनुकरणीय, विशेष किंवा दंडात्मक हानी.

अशी हानी ही करारभंग, अपकृत (दुर्लक्षासह), किंवा अन्यथा इतर गोष्टी केल्यामुळे उद्भवली असो किंवा नसो आणि अशा हानीचा आधीच अंदाज बांधता येण्याजोगा होता किंवा नाही किंवा SCIENCE 37 ला अशा हानीच्या संभाव्यतेबाबत सल्ला दिला गेला होता हे लक्षात न घेता मागील मर्यादा लागू होतील. काही अधिकारक्षेत्रे दायित्वाच्या विशिष्ट मर्यादांना परवानगी देत नाहीत त्यामुळे दायित्वाच्या काही किंवा सर्व मर्यादा तुम्हाला लागू होऊ शकत नाहीत.

नुकसानभरपाई. तुम्ही Science 37 आणि तिचे अधिकारी, संचालक, कर्मचारी, एजंट्स, सहयोगी, उत्तराधिकारींना नुकसानभरपाई, बचाव आणि हानीशिवाय धरण्यास सहमती देता आणि त्यांना कोणत्याही आणि सर्व हानी, नुकसान, दायित्व, कमतरता, दावे, कृती, निर्णय, निपटारे, व्याज, पुरस्कार, शिक्षा, दंड, किमती किंवा कोणत्याही प्रकारचे खर्च यांपासून आणि त्यांविरुध्द नियुक्त करता, ज्यामध्ये तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे सुपुर्द करता किंवा उपलब्ध करून देता अशा सामग्रीसह पण तितकेच मर्यादित न राहता या प्लॅटफॉर्म किंवा सेवांचा वापर किंवा गैरवापरामधून उद्भवणार्‍या किंवा त्याच्याशी संबंधित वाजवी वकीली शुल्काचाही समावेश होतो.

वेगळेपणा. जर या अटी आणि शर्तींच्या कोणत्याही तरतुदी लागू कायद्यांतर्गत बेकायदेशीर किंवा लागू न करण्यायोग्य असतील, तर मूळ अटीचा परिणाम शक्य तितक्या जवळून मिळवण्यासाठी तरतुदीचे उर्वरित भाग सुधारित केले जातील आणि मूळ अटी आणि या अटी आणि शर्तींच्या सर्व इतर तरतुदी लागू राहणे सुरू राहिल.

नियमन कायदा. या अटी व शर्तींवर कायद्याची तरतुद किंवा नियमाला कोणताही पर्याय किंवा विरोधाभास केल्याशिवाय लागू केल्याशिवाय कॅलिफोर्निया, यु.एस.ए. च्या राज्याच्या अंतर्गत कायद्यांनुसार नियमन केले किंवा अर्थ लावला जातो. या अटी आणि शर्तीं किंवा प्लॅटफॉर्ममधून उद्भवणार्‍या किंवा त्यांच्याशी संबंधित्य कोणताही कायदेशीर खटला, कृती किंवा कारवाई हा विशेषत: कॅलिफोर्निया राज्याच्या न्यायालयांमध्ये स्थापन केला. तुम्ही अशा कोर्टांद्वारे आणि अशा कोर्टांमधील स्थानाद्वारे तुम्ही तुमच्यावर अधिकार क्षेत्राच्या अंमलबजावणीला कोणतेही किंवा सर्व आक्षेप माफ करता.

संपूर्ण करार. या अटी आणि शर्ती आणि आमच्या गोपनीयता धोरणामध्ये प्लॅटफॉर्म आणि सेवेच्या संदर्भात तुम्ही आणि Science 37 दरम्यानच्या संपूर्ण कराराचा समावेश होतो आणि ते प्लॅटफॉर्मच्या संदर्भात लेखी असो किंवा मौखिक सर्व पूर्वीच्या किंवा समकालीन समज आणि करारांची जागा घेते.

माफीकोणत्याही एका पक्षाच्या वतीने याअंतर्गत दिलेला कोणताही हक्क किंवा अधिकारावर अंमलबजावणी करण्यास कोणतेही अपयश आणि किंवा त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यामध्ये विलंब हा त्यावरील माफी म्हणून संचालित होईल, याअंतर्गत दिलेला कोणताही हक्क किंवा अधिकाराची कोणतीही एकल किंवा अंशत: अंमलबजावणी हे यांतर्गत त्या किंवा इतर कोणत्याही हक्क आणि अधिकाराच्या अंमलबजावणीला रोखते. या अटी आणि शर्ती आणि कोणत्याही लागू होणार्‍या खरेदी किंवा इतर अटींमधील विरोधाभासाच्या बाबतीत, या अटी आणि शर्तींच्या अटी नियमन करतील.

कराराच्या अटींमध्य अद्यतने.या अटी आणि शर्तींमध्ये वेळाेवेळी अद्यतन केले जाऊ शकते. प्लॅटफॉर्मचा वापर सुरू ठेवून, तुम्ही सर्व अद्ययावत अटींचा स्वीकार करण्यास सहमती देत आहात. जर तुम्ही कोणत्याही अद्ययावत अटी आणि शर्तींशी सहमत नसाल, तर तुम्ही प्लॅटफॉर्मचा वापर करणे थांबवावे.

आमच्याशी संपर्क साधा

जर तुम्हाला या अटी आणि शर्तींविषयी कोणतेही प्रश्न असतील किंवा Science  37 ला सूचना देणे किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता असल्यास कृपया आमच्याशी Legal@Science37.com वर संपर्क साधा.