गोपनीयता धोरण
शेवटचे अद्ययावत केले सप्टेंबर 27, 2023
जागतिक गोपनीयता धोरणाचा उद्देश
Science 37, Inc. (“Science 37“, आम्ही” किंवा “आम्ही”) तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याकरिता, आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया कशी करतो याविषयी तुम्ही माहिती घ्यावी अशी आमची इच्छा आहे. हे Science 37 जागतिक गोपनीयता धोरण (“गोपनीयता धोरण”)आम्ही याद्वारे माहिती कशी गोळा करतो, वापरतो आणि उघड करतो याची रूपरेषा देते: https://www.science37.com/ येथील आमची वेबसाइट; चिकित्सालयीन चाचण्या; आम्ही नियंत्रित करत असलेली सोशल मीडिया पृष्ठे, ज्यावरून तुम्ही या गोपनीयता धोरणात प्रवेश करत आहात (“सोशल मीडिया पृष्ठे”; या गोपनीयता धोरणाची लिंक देणारे आम्ही तुम्हाला पाठवतो असे एचटीएमएल-स्वरूपातील ईमेल संदेश किंवा तुमच्याशी होणारी इतर संप्रेषणे; आणि तुम्ही आमच्याशी करता असे इतर ऑफलाइन परस्परसंवाद. एकत्रितपणे, आम्ही वेबसाइट, सोशल मीडिया पृष्ठे, ईमेल आणि ऑफलाइन व्यवसाय परस्परसंवादांना “सेवा” म्हणून संदर्भित करतो.
तुम्ही चिकित्सालयीन चाचणीसाठी आमचे वेब-आधारित किंवा मोबाइल अनुप्रयोग प्लॅटफॉर्म वापरत असाल, तर Science 37 प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केलेल्या माहितीवर आम्ही कशी प्रक्रिया करतो याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया वेब-आधारित आणि मोबाइल अनुप्रयोग प्लॅटफॉर्म गोपनीयता धोरणाला भेट द्या.
सामग्री सारणी
आम्ही गोळा करतो ती वैयक्तिक आणि इतर माहिती आणि आम्ही ती कशी गोळा करतो
आम्ही तुमच्या माहितीचा वापर आणि त्यावर प्रक्रिया कशी करतो
तुमची माहिती उघड करणे
स्वारस्य-आधारित आणि तृतीय-पक्ष जाहिरातबाजी
तुमच्या माहितीचे हस्तांतरण आणि साठवण
डेटा धारणा
सुरक्षा
संवेदनशील माहिती
मुले
थेट विपणनाबाबत तुमच्या निवडी
तुमचे हक्क
बाह्य किंवा तृतीय-पक्ष लिंक्स
गोपनीयता धोरणामध्ये बदल
आमच्याशी संपर्क कसा साधावा
इइए आणि युके संबंधित अतिरिक्त माहिती
कॅलिफोर्निया बाबत अतिरिक्त माहिती
आम्ही गोळा करतो ती वैयक्तिक आणि इतर माहिती आणि आम्ही ती कशी गोळा करतो
वैयक्तिक माहिती
या गोपनीयता धोरणामध्ये वापरल्याप्रमाणे, “वैयक्तिक माहिती” म्हणजे अशी कोणतीही माहिती जी तुम्हाला एक व्यक्ती म्हणून ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते किंवा वाजवीपणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, विशिष्ट नैसर्गिक व्यक्तीशी जोडता येण्याजोगी असते. या सेवा खालील प्रकारची वैयक्तिक माहिती गोळा करतात: नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल पत्ता, अन्य संपर्क माहिती, नोकरीसाठी अर्जात पुरवलेली रेझ्युमे आणि सीव्ही माहिती, आरोग्य-संबंधित माहिती आणि आयपी ॲड्रेस.
विनंती केलेल्या सेवा तुम्हाला पुरवण्यासाठी आम्हाला वैयक्तिक माहिती गोळा करणे गरजेचे असते. विनंती केलेली माहिती तुम्ही पुरवली नाही, तर आम्हाला सेवा पुरवणे शक्य होऊ शकणार नाही. सेवांच्या संदर्भात तुम्ही आम्हाला किंवा आमच्या सेवा प्रदात्यांना इतर लोकांशी संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती उघड केल्यास, तुम्हाला तसे करण्याचा आणि आम्हाला या गोपनीयता धोरणानुसार ती माहिती वापरण्याची परवानगी देण्याचा प्राधिकार आहे असे तुम्ही घोषित करता.
आम्ही आणि आमचे सेवा प्रदाते सामान्यतः सेवांद्वारे; नोकरी अर्ज प्रक्रियेद्वारे; आणि इतर स्त्रोतांसह, विविध मार्गांनी वैयक्तिक माहिती गोळा करतात.
सेवांद्वारे आणि चिकित्सालयीन चाचणीमध्ये स्वारस्य नोंदवण्याद्वारे
आम्ही वैयक्तिक माहिती सेवांद्वारे गोळा करतो – उदाहरणार्थ, तुम्ही चिकित्सालयीन चाचणीमध्ये स्वारस्य नोंदवता किंवा साइन अप करता, सेवांमध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी खाते नोंदवता, आमच्या एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहता किंवा बातमीपत्रासाठी साइन अप करता तेव्हा.
तुम्ही Science 37 चिकित्सालयीन चाचणीमध्ये नावनोंदणी केली, तर तुम्हाला चिकित्सालयीन चाचणी प्रक्रियेच्या सुरुवातीदरम्यान – वैयक्तिक माहिती गोळा केली जाण्यासहित – डेटावर प्रक्रिया करण्याबद्दल तपशीलवार माहिती प्राप्त होईल.
नोकरीच्या संधी
तुम्ही आमच्या वेबसाइटद्वारे नोकऱ्यांसाठी अर्ज केल्यास, तुमचा अर्ज आणि तुम्ही पुरवता ती कोणतीही अतिरिक्त माहिती Science 37 येथील करिअरच्या संधींकरिता तुमची कौशल्ये आणि स्वारस्ये यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि देश-विशिष्ट कायद्यांद्वारे आवश्यक असू शकतात असे अहवाल देण्याच्या उद्देशांसाठी वापरली जाऊ शकते. तुमच्याशी संप्रेषण करण्यासाठी आणि करिअरच्या संधींबद्दल तुम्हाला कळवण्यासाठीसुद्धा आम्ही तुमची माहिती वापरू शकतो.
अन्य स्त्रोत
आम्हाला तुमची वैयक्तिक माहिती अन्य स्त्रोतांकडून प्राप्त होते – उदाहरणार्थ, सार्वजनिकरित्या उपलब्ध डेटाबेस, चिकित्सालयीन चाचणीत नियुक्त्या करणारे भागीदार आणि संयुक्त विपणन भागीदार, ते आमच्याशी माहिती शेअर करतात तेव्हा.
अन्य माहिती
"अन्य माहिती" म्हणजे तुमची विशिष्ट ओळख उघड न करणारी किंवा ओळखता येण्याजोग्या व्यक्तीशी थेट संबंध न दर्शवणारी कोणतीही माहिती, जिच्यात वापरलेल्या इंटरनेट ब्राउझरचा प्रकार आणि ऑपरेटिंग सिस्टीम; तुम्ही ज्या वेबसाइटवरून आलात त्या वेबसाइटचे डोमेन नाव; भेटींची संख्या; साइटवर घालवलेला सरासरी वेळ; आणि पाहिलेली पृष्ठे यांसारख्या माहितीचा समावेश होतो. आम्ही अन्य माहिती, उदाहरणार्थ, आमच्या वेबसाइटच्या प्रासंगिक अनुरूपतेचे निरीक्षण करणे आणि तिची कामगिरी किंवा सामग्री सुधारणे यांसाठी वापरू शकतो.
लागू कायद्यानुसार आम्हाला अन्यथा वेगळे काही करणे आवश्यक केले जात नाही तोपर्यंत आम्ही अन्य माहिती कोणत्याही कारणासाठी वापरू आणि उघड करू शकतो. लागू कायद्यानुसार आम्हाला अन्य माहिती वैयक्तिक माहिती म्हणून मानणे आवश्यक केले गेल्यास, आम्ही वैयक्तिक माहिती या धोरणात तपशीलवारपणे दिल्यानुसार वापरतो आणि उघड करतो त्या उद्देशांसाठी आम्ही ती वापरू शकतो आणि उघड करू शकतो. काही घटनांमध्ये, आम्ही अन्य माहिती वैयक्तिक माहितीसह एकत्र करू शकतो. आम्ही असे केल्यास, आम्ही अशा एकत्रित माहितीला ती एकत्रित केलेली आहे तोपर्यंत वैयक्तिक माहिती मानू.
आम्ही तुमच्या ब्राउझर किंवा डिव्हाइसमधून; कुकीज; क्लिअर गिफ्स/वेब बीकन्स; ऍनालिटिक्स; सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट्स ("एसडीके") आणि मोबाइल जाहिरात आयडी; तृतीय-पक्ष प्लगइन; तृतीय-पक्ष ऑनलाइन ट्रॅकिंग; अडोब फ्लॅश तंत्रज्ञान; भौतिक स्थान यांसहित विविध प्रकारे अन्य माहिती गोळा करतो.
तुमच्या ब्राउझर किंवा डिव्हाइसमधून
तुमचा मीडिया ऍक्सेस कंट्रोल (एमएसी) ॲड्रेस, संगणकाचा प्रकार (विंडोज किंवा मॅक), स्क्रीन रिझोल्यूशन, ऑपरेटिंग सिस्टीमचे नाव आणि आवृत्ती, डिव्हाइस निर्माता आणि मॉडेल, भाषा, इंटरनेट ब्राउझरचा प्रकार आणि आवृत्ती आणि तुम्ही वापरत असलेल्या सेवांचे नाव आणि आवृत्ती यांसारखी काही माहिती बहुतांश ब्राउझर्सद्वारे किंवा स्वयंचलितपणे तुमच्या डिव्हाइसमधून गोळा केली जाते. सेवा योग्यरितीने कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही ही माहिती वापरतो.
कुकीज (तुमच्या संगणकावर स्वयंचलितपणे संग्रहित केली जाणारी माहिती)
आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. कुकीज या तुमच्या वेब ब्राउझरद्वारे तुमच्या संगणकावर संग्रहित केल्या जातात अशा छोट्या फाईल्स असतात. कुकी आमच्या वेबसाइटला तुम्ही आधी भेट दिली आहे का हे ओळखू देते आणि ती वापरकर्ता प्राधान्ये आणि इतर माहिती संग्रहित करू शकते. उदाहरणार्थ, तुमच्या वर्तमान सत्रादरम्यान आणि कालांतराने (तुम्ही पाहता ती पृष्ठे आणि तुम्ही डाउनलोड करता त्या फाइल्ससह) तुमचा आमच्या वेबसाइटचा वापर, तुमच्या संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम आणि ब्राउझरचा प्रकार, तुमचा इंटरनेट सेवा प्रदाता, तुमचे डोमेन नाव आणि आयपी ॲड्रेस, तुमचे सामान्य भौगोलिक स्थान, तुम्ही आमच्या वेबसाइटपूर्वी भेट दिलेली वेबसाइट आणि तुम्ही आमची वेबसाइट सोडण्यासाठी वापरलेली लिंक याबाबतची माहिती गोळा किंवा संग्रहित करण्यासाठी कुकीज वापरता येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या संगणकावर कुकीज असण्याची काळजी वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या ब्राउझरला सर्व कुकीज नाकारण्यासाठी किंवा कुकी कधी सेट केली जात आहे हे सूचित करण्यासाठी सेट करू शकता, ज्यामुळे तुम्हाला ती स्वीकारायची का हे ठरवता येऊ शकते. तुम्ही तुमच्या संगणकावरून कुकीज हटवू देखील शकता. तथापि, तुम्ही कुकीज ब्लॉक करणे किंवा हटवणे निवडल्यास, वेबसाइटची काही वैशिष्ट्ये कदाचित योग्यरित्या कार्य करू शकणार नाहीत.
Science 37 च्या कुकीजच्या वापरासंबंधित तपशीलवार माहितीसाठी, कृपया Science 37 कुकी धोरण संदर्भित करा.
क्लिअर गिफ्स
आम्ही ई-टॅग आणि जावास्क्रिप्ट यांसारख्या इतर तंत्रज्ञानांसह क्लिअर गिफ्स नावाचे (वेब बीकन्स, वेब बग्ज किंवा पिक्सेल टॅग म्हणूनही ओळखले जाते) सॉफ्टवेअर तंत्रज्ञान वापरतो, जे आम्हाला कोणती सामग्री परिणामकारक आहे याची माहिती देऊन आमच्या साइटवरील सामग्री चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करते. क्लिअर गिफ्स ही अद्वितीय आयडेंटिफायर असलेली अत्यंत छोटी ग्राफिक्स असतात, ज्यांचे कार्य वेब वापरकर्त्यांच्या ऑनलाइन हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुकीज प्रमाणेच असते. ज्या वापरकर्त्याच्या संगणकाच्या हार्ड ड्राइव्हवर संग्रहित केल्या जातात अशा कुकीजच्या उलट, आकाराने जवळपास पूर्णविरामाइतकी असलेली क्लिअर गिफ्स वेब पृष्ठांवर अदृश्यपणे एम्बेड केलेली असतात. आम्ही क्लिअर गिफ्स, ई-टॅग्ज किंवा जावास्क्रिप्टद्वारे गोळा केलेली माहिती आमच्या वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीशी जोडत नाही. Science 37 च्या क्लिअर गिफ्स आणि इतर तंत्रज्ञानांच्या वापरासंबंधी तपशीलवार माहितीसाठी, कृपया Science 37 कुकी धोरण संदर्भित करा.
विश्लेषणे
वर चर्चा केलेली स्वयंचलितपणे संकलित केलेली माहिती मिळवण्यासाठी आणि विश्लेषण, लेखापरिक्षण, संशोधन आणि अहवाल मिळवण्यासाठी आम्ही काही तृतीय पक्षांशी भागीदारी करतो. हे तृतीय पक्ष वेब लॉग किंवा वेब बीकन्स वापरू शकतात आणि ते तुमच्या संगणकावर किंवा इतर डिव्हाइसवर कुकीज सेट आणि ॲक्सेस करू शकतात. विशेषतः, वर चर्चा केलेल्या उद्देशांकरिता विशिष्ट माहिती गोळा आणि विश्लेषण करण्यात मदत करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ॲनालिटिक्स वापरते. तुम्ही गूगल ॲनालिटिक्सद्वारे कुकीज वापरली जाण्यातून येथे बाहेर पडू शकता.
एसडीके आणि मोबाइल जाहिरात आयडी
आमच्या सेवांमध्ये तृतीय-पक्ष एसडीके समाविष्ट असू शकतात जे आम्हाला आणि आमच्या सेवा प्रदात्यांना तुमच्या कृतीविषयी माहिती गोळा करू देतात. या व्यतिरिक्त, काही मोबाइल डिव्हाइसेस रीसेट करण्यायोग्य जाहिरात आयडीसह (ॲपलचा आयडीएफए आणि गूगलचा जाहिरात आयडी यांसारख्या) येतात जे कुकीज आणि पिक्सेल टॅग्स सारखे, आम्हाला आणि आमच्या सेवा प्रदात्यांना जाहिरातींच्या उद्देशाने तुमचा मोबाइल डिव्हाइस ओळखू देतात.
तृतीय-पक्ष प्लगइन्स
आमच्या वेबसाइटमध्ये सोशल मीडिया कंपन्यांसह इतर कंपन्यांचे प्लगइन्स (उदा. फेसबुक “लाइक” बटण) समाविष्ट असू शकतात. हे प्लगइन्स तुम्ही भेट देत असलेल्या पृष्ठांची माहिती यांसारखी माहिती संकलित करू शकतात, आणि तुम्ही प्लगइनवर क्लिक केले नाही तरीही प्लगइन तयार करणाऱ्या कंपनीसोबत ती शेअर करू शकतात. हे तृतीय-पक्ष प्लगइन्स ज्या कंपन्यांनी बनवले त्यांच्या गोपनीयता धोरणांद्वारे आणि अटींद्वारे प्रशासित केले जातात.
तृतीय-पक्ष ऑनलाइन ट्रॅकिंग
या विभागात वर्णन केलेली काही माहिती गोळा करण्यासाठी, विश्लेषित करण्यासाठी आणि वापरण्यासाठी आम्ही काही तृतीय पक्षांशी देखील भागीदारी करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही तृतीय पक्षांना कुकीज सेट करण्यास किंवा वेबसाइटवर किंवा आमच्याकडील ईमेल संप्रेषणांमध्ये वेब बीकन्स वापरण्याची अनुमती देऊ शकतो. ही माहिती ऑनलाइन वेबसाइट ॲनालिटिक्स आणि स्वारस्य-आधारित जाहिरातींसह विविध उद्देशांसाठी वापरली जाऊ शकते. कृपया या वापराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी “ॲनालिटिक्स आणि स्वारस्य-आधारित जाहिराती” शीर्षकाचा खालील विभाग पाहा.
एकत्रित केलेली आणि ओळखविरहित माहिती
वेळोवेळी, आम्ही सेवांच्या वापरकर्त्यांबद्दल एकत्रित केलेली किंवा ओळखविरहित माहिती देखील गोळा आणि शेअर करू शकतो. अशी एकत्रित केलेली किंवा ओळखविरहित माहिती तुमची वैयक्तिकरित्या ओळख पटवणार नाही.
आम्ही तुमच्या माहितीचा वापर आणि त्यावर प्रक्रिया कशी करतो
आम्ही आणि आमचे सेवा प्रदाते आम्ही गोळा करतो ती वैयक्तिक माहिती खालील उद्देशांसाठी वापरतो:
तुमच्याशी आमचे कराराचे संबंध व्यवस्थापित करण्यासाठी आणि/किंवा कायदेशीर बंधनाचे पालन करण्यासाठी आम्ही या क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ.
आम्ही तुमच्या संमतीने किंवा आमचे कायदेशीर स्वारस्य असेल तेथे या कृतीत सहभागी होऊ.
आम्ही आमच्या कायदेशीर स्वारस्यांवर आधारित आणि तुमच्या संमतीने लागू कायद्यानुसार आवश्यक मर्यादेपर्यंत वैयक्तिकीकृत सेवा प्रदान करू.
आम्ही तुमच्याशी आमचे कराराचे नाते व्यवस्थापित करण्यासाठी, कायदेशीर बंधनाचे पालन करण्यासाठी आणि/किंवा आमच्या कायदेशीर हितसंबंधांवर आधारित या क्रियाकलापांमध्ये सहभागी होतो.
आम्ही वेबसाइटद्वारे गोळा केलेली माहिती आम्ही इतर संदर्भांमध्ये गोळा केलेल्या माहितीशी जोडू शकतो. परंतु त्या घटनेत, आम्ही एकत्रित माहिती या गोपनीयता धोरणाशी सुसंगतपणे हाताळू.
तुमची माहिती उघड करणे
आमच्या चिकित्सालयीन चाचण्यांना समर्थन देणारे तृतीय पक्ष; इतर तृतीय-पक्ष सेवा प्रदाते; आणि इतर मार्गांद्वारे आम्ही वैयक्तिक माहिती उघड करतो. तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती स्वतः देखील उघड करू शकता.
चिकित्सालयीन चाचण्या
गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केल्यानुसार आम्ही गोळा केलेली वैयक्तिक माहिती किंवा तुम्ही आम्हाला पुरवलेली वैयक्तिक माहिती आम्ही आमच्या चिकित्सालयीन चाचण्या किंवा इतर सेवांना समर्थन देण्यासाठी वापरत असलेल्या तृतीय पक्षांना उघड करू शकतो. असा कोणताही तृतीय पक्ष वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यासाठी आणि ज्या उद्देशांसाठी आम्ही ती त्यांना उघड करतो त्या उद्देशांसाठीच ती वापरण्यासाठी कराराच्या बंधनांनी बांधील आहे.
तृतीय-पक्ष सेवा प्रदाते
Science 37 वेब-होस्टिंग कंपन्या, मेलिंग विक्रेते आणि ॲनालिटिक्स प्रदात्यांसहित तृतीय-पक्ष सेवा प्रदाते वापरते जे आमच्या वतीने सेवा देतात. हे सेवा प्रदाते, वर चर्चा केलेले उद्देश साध्य करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या वैयक्तिकरित्या ओळख पटवणाऱ्या माहितीसहित तुमची माहिती गोळा करू शकतात आणि/किंवा वापरू शकतात.
सेवांसाठी तुमच्या विनंत्या पूर्ण करण्यासाठी; तुम्ही सुरू करता तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी; तुमच्या आमच्याशी किंवा आमच्या भागीदारांशी असलेल्या कोणत्याही कराराच्या अटी पूर्ण करण्यासाठी; किंवा आमचा व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असेल तेव्हा आम्ही तुमची माहिती इतर तृतीय पक्षांसोबत शेअर करू शकतो.
इतर उपयोग आणि प्रकटीकरणे
आम्ही तुमची वैयक्तिक माहिती आवश्यक असेल किंवा योग्य असेल तेव्हा वापरतो आणि उघड करतो, विशेषत: आम्हाला तसे करण्याचे कायदेशीर बंधन किंवा कायदेशीर स्वारस्य असते तेव्हा, ज्यात यांचा समावेश होतो:
तुमची स्वतःची प्रकटीकरणे
या सेवा वापरून, तुम्ही वैयक्तिक माहिती उघड करणे निवडू शकता. यामध्ये मेसेज बोर्ड्स, चॅट, प्रोफाइल पृष्ठे, ब्लॉग्ज आणि ज्यावर तुम्ही माहिती आणि सामग्री पोस्ट करू शकता (आमच्या सोशल मीडिया पृष्ठांच्या समावेशासहित, मर्यादेशिवाय) अशा इतर सेवा यांद्वारा प्रकटीकरणाचा समावेश होतो. तुम्ही या सेवांद्वारे पोस्ट किंवा उघड करता अशी कोणतीही माहिती सार्वजनिक होईल आणि ती इतर वापरकर्त्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी उपलब्ध असू शकेल याची कृपया नोंद घ्या. यामध्ये तुमच्या सोशल शेअरिंग कृतीद्वारे प्रकटीकरण देखील समाविष्ट होते.
स्वारस्य-आधारित आणि तृतीय-पक्ष जाहिरातबाजी
ऑनलाइन स्वारस्य-आधारित जाहिरातबाजीमध्ये वापरण्यासाठी वेबसाइट तुमच्याबद्दल आणि तुमच्या संगणकीय उपकरणांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी तृतीय-पक्ष ट्रॅकिंग यंत्रणा देखील सक्षम करते. उदाहरणार्थ, फेसबुकसारखे तृतीय पक्ष, ऑनलाइन जाहिराती तुमच्याकडे लक्ष्य करण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट दिली या वस्तुस्थितीचा वापर करू शकतात. या व्यतिरिक्त, आमची तृतीय-पक्ष जाहिरातबाजी नेटवर्क्स सामान्यपणे तुमच्या ऑनलाइन कृतीवर आधारित जाहिराती लक्ष्य करण्यात मदत होण्यासाठी आमच्या वेबसाइटच्या तुमच्या वापराबद्दलची माहिती वापरू शकतात. गोपनीयता आणि गुप्तता यांसह स्वारस्य-आधारित जाहिरातबाजीच्या पद्धतींबद्दल माहितीसाठी नेटवर्क ऍडव्हर्टायझिंग इनिशिएटिव्ह वेबसाइट किंवा डिजिटल ऍडव्हर्टायझिंग अलायन्स वेबसाइटला भेट द्या.
तृतीय पक्षांद्वारे ऑनलाइन ट्रॅकिंग यंत्रणांचा वापर त्या तृतीय पक्षांच्या स्वतःच्या गोपनीयता धोरणांच्या अधीन आहे, आणि या गोपनीयता धोरणाच्या अधीन नाही. तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा इतर डिव्हाइसवर कुकीज सेट करण्यापासून आणि ॲक्सेस करण्यापासून तृतीय पक्षांना प्रतिबंधित करणे पसंत करत असल्यास, तुम्ही तुमचा ब्राउझर कुकीज ब्लॉक करण्यासाठी सेट करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही येथे बाहेर पडून नेटवर्क ॲडव्हर्टायझिंग इनिशिएटीव्हमधील कंपन्यांच्या लक्ष्यित ॲडव्हर्टायझिंगमधून स्वतःला काढून टाकू शकता किंवा येथे बाहेर पडून डिजिटल ॲडव्हर्टायझिंग अलायन्समध्ये भाग घेणाऱ्या कंपन्यांच्या लक्ष्यित ॲडव्हर्टायझिंगमधून स्वतःला काढून टाकू शकता. जरी आमची वेबसाइट सध्या "ट्रॅक करू नका" ब्राउझर हेडरना प्रतिसाद देत नसली तरी, तुम्ही या तृतीय-पक्ष प्रोग्रामद्वारे आणि वर चर्चा केलेल्या इतर पायऱ्या अनुसरून ट्रॅकिंग मर्यादित करू शकता.
आम्ही कुकीज कशा वापरतो आणि तुम्ही तुमची कुकी प्राधान्ये कशी समायोजित करू शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कुकी धोरणाला देखील भेट देऊ शकता.
तुमच्या माहितीचे हस्तांतरण आणि साठवण
Science 37 चे मुख्यालय युनायटेड स्टेट्समधील रॅले, उत्तर कॅरोलिनायेथे आहे. तुमची वैयक्तिक माहिती आमच्या सुविधा आहेत अशा किंवा आम्ही ज्या देशातील सेवा प्रदात्यांना काम देतो अशा कोणत्याही देशात संग्रहित आणि प्रक्रिया केली जाऊ शकते आणि सेवा वापरून तुम्ही समजता की तुमची माहिती युनायटेड स्टेट्ससह तुमच्या निवासाच्या देशाबाहेरील देशांमध्ये हस्तांतरित केली जाईल, जेथे तुमच्या देशाच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत असे डेटा संरक्षण नियम असू शकतात. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, न्यायालये, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीज, नियामक एजन्सीज किंवा त्या इतर देशांतील सुरक्षा प्राधिकरणे यांना तुमच्या वैयक्तिक माहितीत प्रवेश करण्यास मान्यता असू शकते.
इइए, स्वित्झर्लंड आणि युके संबंधी अतिरिक्त माहिती
युरोपियन कमिशन, स्वित्झर्लंड आणि यूके द्वारे ईईए नसलेले काही देश त्यांच्या मानकांनुसार पुरेशा पातळीचे डेटा संरक्षण प्रदान करण्यासाठी ओळखले गेले आहेत (पुरेसे संरक्षण असलेल्या देशांची संपूर्ण यादी येथे उपलब्ध आहे). इइए, स्वित्झर्लंड आणि युके मधून युरोपियन कमिशनने पुरेसे मानले नसलेल्या देशांमध्ये हस्तांतरणासाठी, आम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी युरोपियन कमिशनने स्वीकारलेल्या मानक कराराच्या कलमांसारखे पुरेसे उपाय योजले आहेत. खालील "आमच्याशी संपर्क कसा साधावा" विभागानुसार आमच्याशी संपर्क साधून तुम्ही या उपायांची प्रत मिळवू शकता.
तुमच्या वैयक्तिक माहितीचे हस्तांतरण किंवा साठवण याबद्दल तुम्हाला काही गोपनीयतेशी संबंधित प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी Privacy@Science37.com वर संपर्क साधा.
डेटा धारणा
आम्ही तुमची वैयक्तिक माहिती या गोपनीयता धोरणात नमूद केल्यानुसार आणि/किंवा लागू कायद्यानुसार ज्या उद्देशा(शां)साठी प्राप्त केली गेली होती त्यासाठी गरजेच्या किंवा परवानगी दिलेल्या कालावधीकरिता राखतो.
आमच्या धारणा कालावधी निर्धारित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निकषांमध्ये हे समाविष्ट आहे:
सुरक्षा
Science 37 तुम्ही आमच्यासोबत शेअर करत असलेल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी वचनबध्द आहे.
तुमची वैयक्तिक माहिती अनधिकृत प्रवेश, वापर किंवा प्रकटीकरणापासून संरक्षित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही वाजवी सुरक्षा तंत्रज्ञान, कार्यपद्धती आणि संस्थात्मक उपायांच्या एकत्रीकरणाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. दुर्दैवाने, कोणतेही डेटा वहन किंवा साठवण सिस्टीम 100% सुरक्षित असल्याची हमी दिली जाऊ शकत नाही. आमच्याशी तुमचा परस्परसंवाद यापुढे सुरक्षित राहणार नाही यावर तुमचा विश्वास असण्यासाठी काही कारण असल्यास, कृपया खालील "आमच्याशी संपर्क कसा साधावा" या विभागानुसार आम्हाला त्वरित सूचित करा.
संवेदनशील माहिती
आम्ही जेथे तशी विनंती करतो ते वगळता, तुम्ही कोणतीही संवेदनशील वैयक्तिक माहिती (उदा. सामाजिक सुरक्षा क्रमांक, कूळ किंवा वांशिक मूळाशी संबंधित माहिती, राजकीय मते, धर्म किंवा इतर श्रद्धा, आरोग्य, बायोमेट्रिक्स किंवा जनुकीय वैशिष्ट्ये, गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा ट्रेड युनियन सदस्यत्व) सेवांवर किंवा त्यांद्वारे किंवा अन्यथा आम्हाला पाठवू नका आणि तुम्ही उघड करू नका असे आम्ही सांगतो.
मुले
Science 37 च्या सेवा अठरा (18) वर्षांखालील वयाच्या व्यक्तींसाठी निर्देशित केल्या जात नाहीत आणि लागू कायद्यानुसार आवश्यक असल्यास, अल्पवयीन मुलांच्या आईवडिलांची किंवा कायदेशीर पालकांची संमती मागितल्याशिवाय आणि प्राप्त केल्याशिवाय आम्ही जाणूनबुजून 16 वर्षाखालील व्यक्तींकडून वैयक्तिक माहिती गोळा करत नाही.
थेट विपणनाबाबत तुमच्या निवडी
आम्ही तुम्हाला विपणनासाठीच्या उद्देशांसहित तुमच्या वैयक्तिक माहितीचा आमचा वापर आणि प्रकटीकरण यासंबंधी निवडी देतो.
तुम्हाला भविष्यात आमच्याकडून ईमेल प्राप्त करायचे नसल्यास, तुम्ही कधीही “अनसब्स्क्राइब करा” लिंकवर क्लिक करून किंवा Privacy@Science37.com वर संपर्क साधून अनसब्स्क्राइब करू शकता.
Science 37 अंशतः बाहेर पडण्याचा पर्याय देखील देते. हा पर्याय तुम्हाला तुम्ही पुरवू इच्छित असलेले आणि नसलेले डेटा घटक निवडू देतो. विशिष्ट डेटा घटक पुरवण्यातून बाहेर पडण्याबाबत अधिक माहितीसाठी, Privacy@Science37.com वर आमच्याशी संपर्क साधा.
Science 37 तुमच्या संमतीशिवाय तृतीय पक्षांशी त्यांच्या थेट विपणन उद्देशांसाठी वैयक्तिक माहिती शेअर करत नाही.
Science 37 तुमच्या विनंती(त्यां)चे पालन जितक्या लवकर वाजवीरित्या व्यवहार्य आणि लागू कायद्याशी सुसंगत असेल तितके करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आमच्याकडून विपणन संबंधित ईमेल्स प्राप्त करण्यातून बाहेर पडला, तरीही आम्ही तुम्हाला महत्त्वाचे प्रशासकीय संदेश पाठवू शकतो, ज्यामधून तुम्ही बाहेर पडू शकत नाही, याची कृपया नोंद घ्या.
तुमचे हक्क
तुम्हाला वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश करणे, दुरुस्त करणे, अपडेट करणे, दडपणे, प्रतिबंधित करणे किंवा हटवणे, तिच्यावर प्रक्रिया करण्यावर आक्षेप घेणे किंवा त्यातून बाहेर पडण्याची विनंती करायची असल्यास, किंवा दुसऱ्या कंपनीकडे प्रसारित करण्याच्या उद्देशाने (लागू कायद्याद्वारे हे अधिकार तुम्हाला प्रदान केले जातात त्या प्रमाणात) तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीची प्रत प्राप्त करण्याची विनंती करायची असल्यास, कृपया या गोपनीयता धोरणाच्या शेवटी दिलेली संपर्क माहिती वापरून आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्या विनंतीला लागू होणाऱ्या कायद्याशी सुसंगत प्रतिसाद देऊ. तुम्ही कॅलिफोर्नियाचे रहिवासी असल्यास, सीसीपीए अंतर्गत तुम्ही करू शकणाऱ्या विनंत्यांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया या गोपनीयता धोरणाच्या शेवटी असलेल्या “कॅलिफोर्नियाशी संबंधित अतिरिक्त माहिती” विभागाचा संदर्भ घ्या.
तुमच्या विनंतीनुसार, तुम्ही कोणती वैयक्तिक माहिती बदलू इच्छिता किंवा आमच्या डेटाबेसमधून तुमची वैयक्तिक माहिती दडपून ठेवू इच्छिता का हे कृपया स्पष्ट करा. तुमच्या संरक्षणासाठी, फक्त तुम्ही आम्हाला तुमची विनंती पाठवण्यासाठी वापरत असलेल्या विशिष्ट ईमेल ॲड्रेसशी संबंधित वैयक्तिक माहितीच्या संदर्भातील विनंत्यांवरच आम्ही कार्यवाही करू शकतो आणि तुमच्या विनंतीवर कार्यवाही करण्यापूर्वी आम्हाला तुमची ओळख पडताळणे गरजेचे असू शकते. आम्ही तुमच्या विनंतीचे पालन करण्याचा प्रयत्न वाजवीरित्या व्यवहार्य तितक्या लवकर करू.
रेकॉर्ड ठेवण्याच्या उद्देशाने आम्हाला काही विशिष्ट माहिती राखणे गरजेचे असू शकते याची कृपया नोंद घ्या.
तुम्ही माघार घेतल्यास किंवा चिकित्सालयीन चाचणीमधून तुम्हाला काढून टाकल्यास, आम्ही सेवांमधून कोणतीही नवीन माहिती गोळा करणार नाही किंवा प्राप्त करणार नाही. तथापि, तुमची माघार घेण्याची विनंती प्राप्त होण्याच्या वेळेपर्यंत आधीच गोळा केलेली, प्रक्रिया केलेली आणि संग्रहित केलेली माहिती हटवली जाऊ शकणार नाही, आणि लागू कायद्यानुसार अन्य काही आवश्यक नसल्यास, नियामक आवश्यकतांच्या अनुपालनासह, चिकित्सालयीन चाचणीच्या उद्देशासाठी वापरली जाऊ शकते.
बाह्य किंवा तृतीय-पक्ष लिंक्स
या वेबसाइटमध्ये तृतीय-पक्षाच्या वेबसाइटच्या लिंक्स असू शकतात. तुम्ही या लिंक्स वापरल्यास, तुम्ही ही वेबसाइट सोडाल. हे गोपनीयता धोरण या सेवा लिंक करतात अशी कोणतीही वेबसाइट किंवा सेवा ऑपरेट करणाऱ्या कोणत्याही तृतीय पक्षासह कोणत्याही तृतीय पक्षाच्या गोपनीयता, माहिती किंवा इतर पद्धती संबोधित करत नाही आणि त्यासाठी जबाबदार नाही. सेवांवर लिंक्सचा समावेश करणे हे जोडलेल्या साइट किंवा सेवेला आमचे समर्थन सूचित करत नाही.
याशिवाय, Facebook, Apple, Google, Microsoft, RIM, किंवा इतर कोणतेही ॲप डेव्हलपर, ॲप प्रदाता, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रदाता, ऑपरेटिंग सिस्टीम प्रदाता, वायरलेस सेवा प्रदाता किंवा डिव्हाइस निर्माता, यांसारख्या इतर संस्थांद्वारा, तसेच आमच्या सोशल मीडिया पृष्ठांद्वारे किंवा त्यांच्या संबंधात तुम्ही इतर संस्थांना उघड करत असलेल्या कोणत्याही वैयक्तिक माहितीच्या संदर्भातील माहितीचे संकलन, वापर, प्रकटीकरण किंवा सुरक्षा धोरणे किंवा पद्धतींसाठी आम्ही जबाबदार नाही. तुम्ही आमच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही तृतीय-पक्ष वेबसाइट्सवर प्रवेश करण्याचे ठरविल्यास, तुम्ही ते तुमच्या स्वत:च्या जोखमीवर करता.
गोपनीयता धोरणामध्ये बदल
आम्ही वेबसाइटमध्ये भविष्यात बदल करू शकतो आणि परिणामी, ते बदल दर्शवण्यासाठी आम्हाला या गोपनीयता धोरणात सुधारणा करावी लागेल. आम्ही वेबसाइटवर असे सर्व बदल पोस्ट करू, त्यामुळे तुम्ही या पृष्ठाचे वेळोवेळी पुनरावलोकन केले पाहिजे. आम्ही आमच्या सेवांवर सुधारित गोपनीयता धोरण पोस्ट केल्यावर कोणतेही बदल प्रभावी होतील.
आमच्याशी संपर्क कसा साधावा
Science 37 जागतिक गोपनीयता धोरणाबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा टिप्पण्या असल्यास, कृपया आमच्याशी Privacy@Science37.com येथे संपर्क साधा. तुम्ही आमच्याडेटा संरक्षण ऑफिसरशी येथे देखील संपर्क साधू शकता:
Science 37, Inc.
Attention: Data Protection Officer
3005 Carrington Mill Blvd, Suite #500
Morrisville NC 27560
इइए आणि युके संबंधित अतिरिक्त माहिती
Science 37 युनायटेड स्टेट्स मध्ये स्थित आहे. Science 37 ईईए आणि यूके मधून यूएस मध्ये वैयक्तिक माहिती हस्तांतरित करण्यासाठी ईईए आणि यूके मंजूर मानक करार कलम आणि इतर मंजूर यंत्रणांचे पालन करते आणि वापरते.
तुम्ही हे देखील करू शकता
कॅलिफोर्निया बाबत अतिरिक्त माहिती
2018 च्या कॅलिफोर्निया ग्राहक गोपनीयता कायदा (“सीसीपीए”) नुसार, कॅलिफोर्नियाच्या रहिवाशांबद्दल आम्ही गोळा करतो, वापरतो आणि उघड करतो त्या वैयक्तिक माहितीच्या प्रवर्गांबाबत आम्ही पुढील अतिरिक्त तपशील पुरवत आहोत.
वैयक्तिक माहितीचे संकलन, प्रकटीकरण
खालील तक्त्यामध्ये हे समाविष्ट आहे: (1) सीसीपीएमध्ये सूचीबद्ध केल्यानुसार वैयक्तिक माहितीचे प्रवर्ग, जे आम्ही गोळा करण्याचे योजत आहोत आणि मागील 12 महिन्यांमध्ये गोळा आणि उघड केले; आणि (2) तृतीय पक्षांचे प्रवर्ग ज्यांना आम्ही मागील 12 महिन्यांमध्ये आमच्या परिचालनात्मक व्यावसायिक उद्देशांसाठी वैयक्तिक माहिती उघड केली.
|
|
|
|
|
|
वैयक्तिक माहितीची विक्री आणि ती शेअर करणे
सीसीपीए अंतर्गत, व्यवसायाने वैयक्तिक माहिती विकल्यास, त्याने कॅलिफोर्नियाच्या रहिवाशांना त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या विक्रीतून बाहेर पडण्याची अनुमती दिली पाहिजे. आम्ही वैयक्तिक माहिती "विकत" नाही. आम्ही 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांची वैयक्तिक माहिती विकत नाही. सीसीपीए द्वारे व्याख्या केल्यानुसार क्रॉस-संदर्भ वर्तनात्मक जाहिरातींच्या उद्देशाने तृतीय पक्षाला वैयक्तिक माहितीचे प्रकटीकरण आहे वैयक्तिक माहिती आम्ही शेअर करत नाही.
वैयक्तिक माहितीचे स्त्रोत
तुम्ही सेवांद्वारे आमच्याशी संपर्क साधता तेव्हा तुमच्याकडील माहितीसह, आम्ही वर वर्णन केल्याप्रमाणे ही वैयक्तिक माहिती गोळा करतो.
वैयक्तिक माहितीचा वापर
आम्ही या वैयक्तिक माहितीचा वापर आमचा व्यवसाय चालवणे, व्यवस्थापित करणे आणि त्यावर देखरेख करण्यासाठी, आमची उत्पादने आणि सेवा पुरण्यासाठी आणि वर वर्णन केल्यानुसारच्या समावेशासह आमचे व्यवसाय उद्देश आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी करू शकतो.
सीसीपीए अधिकार आणि विनंत्या
काही मर्यादा आणि अपवादांच्या अधीन राहून, कॅलिफोर्नियाचे रहिवासी खालील विनंत्या करू शकतात:
विनंती करण्यासाठी, कृपया आमच्याशी 1-866-888-7580 वर किंवा वरील “आमच्याशी संपर्क कसा साधावा” या विभागानुसार संपर्क साधा. विनंतीच्या अधीन असलेल्या वैयक्तिक माहितीचा प्रकार आणि संवेदनशीलता विचारात घेऊन आम्ही तुमच्या विनंतीची पडताळणी लागू कायद्याशी सुसंगत पद्धतीने करू आणि प्रतिसाद देऊ. तुमची ओळख पडताळण्यासाठी आणि फसवेगिरीच्या विनंत्यांपासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून तुमचे नाव, ईमेल ॲड्रेस किंवा फोन क्रमांक यांसारख्या अतिरिक्त वैयक्तिक माहितीची विनंती करावी लागू शकते. तुम्ही 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या वतीने तुम्ही त्या मुलाचे मातापिता किंवा कायदेशीर पालक असाल तर विनंती करू शकता. तुम्ही हटवण्याची विनंती केल्यास, आम्ही तुमची वैयक्तिक माहिती हटवण्यापूर्वी आम्ही तुम्हाला तुमच्या विनंतीची पुष्टी करण्यास सांगू शकतो.
तुम्हाला कॅलिफोर्नियाच्या रहिवाशाच्या वतीने प्राधिकृत एजंट म्हणून जाणून घेण्याची विनंती किंवा हटवण्याची विनंती करायची असल्यास, तुम्ही वर नमूद केलेल्या सबमिशन पद्धती वापरू शकता. आमच्या पडताळणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून, तुम्ही प्राधिकृत एजंट म्हणून तुमच्या स्थितीचा पुरावा द्यावा अशी विनंती आम्ही करू शकतो, ज्यामध्ये हे देखील समाविष्ट असू शकते:
1. कॅलिफोर्नियामध्ये व्यवसाय करण्यासाठी कॅलिफोर्निया सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे तुमच्या नोंदणीचा पुरावा;
2. प्रोबेट कोड विभाग 4121-4130 च्या अनुषंगाने रहिवाशाकडून पॉवर ऑफ ॲटर्नीचा पुरावा.
तुम्ही प्राधिकृत एजंट असाल आणि प्रोबेट कोड विभाग 4121-4130 नुसार आम्हाला रहिवाशाकडून पॉवर ऑफ ॲटर्नी पुरवली नसल्यास, आम्ही रहिवाशाला हे करणे देखील आवश्यक करू शकतो:
1. रहिवाशाची स्वतःची ओळख थेट आमच्याकडे पडताळणे; किंवा
2. रहिवाशाने तुम्हाला विनंती करण्याची परवानगी दिली आहे याची आमच्याशी थेट पुष्टी करणे.
संवेदनशील वैयक्तिक माहितीचा वापर आणि प्रकटीकरण मर्यादित करण्याचा अधिकार
Science 37 सीसीपीएने प्राधिकृत केलेल्या उद्देशांपलीकडे संवेदनशील वैयक्तिक माहिती वापरत नाही किंवा उघड करत नाही.
डेटा धारणा विभाग
Science 37 फक्त या धोरणात वर्णन केलेल्या उद्देशांसाठी वाजवीपणे आवश्यक म्हणून किंवा अन्यथा संग्रहाच्या वेळी तुम्हाला उघड केली जाते, किंवा तुमच्याद्वारे प्राधिकृत केली जाते किंवा कायद्यानुसार आवश्यक असते तितकीच आम्ही गोळा केलेली वैयक्तिक माहिती धारण करते.
भेदभाव न करण्याचा हक्क
तुम्हाला सीसीपीए खालील तुमच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी बेकायदेशीर भेदभावपूर्ण वागणुकीपासून मुक्त राहण्याचा हक्क आहे.